या दरम्यान लोला एका दुकानातून सामान घेत असताना तिची मोपेड चोरी होते. फ़ोन चालू असताना या घटना फ्लाश्बैक मधे दिसत राहतात. पुढच्या वीस मिनिटांत जर ती गुंडाला दिली नाही, तर तो आपला खून करेल, असा मनी लोलाला सांगतो आणि हातातला रिसिव्हर क्रेडलवर आपटून मनीला मदत करायला लोला धावत सुटते!
चित्रपटाचा गाभा या २० मिनिट मधे आहे, प्रत्येक वेळी एक नविन शक्यता, जसा की पाटी पुसून परत नव्याने सुरुवात. प्रत्येक २० मिनिटाच्या run मधे लोला ज्या ज्या लोकाना भेटते, किंवा screen वर जे लोक सातत्याने येत राहतात त्यांच्या आयुष्याबद्दल दिग्दर्शकाने फल्श्बैक मधे घेतलेला आढावा, in form of snapshots, बदलत राहतो.
शक्यता १:
फ़ोन क्रेडल वर आपटून लोला धावत सुटते, घरातून निघाल्यावर स्टेप्स वर शेजार्याचा कुत्रा तिच्यावर धावून येतो, ज्याने लोला अजुन जोरात धावायला लागते.लोला वडिलांकडे जाते, पैसे मागते. ते "नाही' म्हणतात. "तू माझी खरी मुलगी नाहीस आणि मी आता तुम्हाला सोडून दुसरं लग्न करणार आहे,' असं तिला ऐकवून हाकलतात. लोला पळत मनी आहे तिथं जाते.
दोघं मिळून तिथलंच एक स्टोअर लुटतात. पैशाची पिशवी घेऊन बाहेर येतात, पोलिसांच्या हातून सुटलेली गोळी लोलाला लागते, ती कोसळते. तिला मनीबरोबरचा संवाद आठवतो, "तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का' या प्रश्नातून प्रश्न-उत्तरं सुरू होतात; ती संपत नाहीत. रस्त्यावर पडलेल्या लोलाचा क्लोजअप दिसतो - मनीच्या हातून सुटलेली पैशांची पिशवी खाली पडताना दिसते - लोला किंचाळते "स्टॉप!' - खाली पडणारी पिशवी आणि खाली पडणारा टेलिफोन रिसिव्हर यांचे इंटरकट्स दिसतात- फोन आपटतो- लोला पळू लागते- एक शक्यता संपते!
शक्यता २:
फोन आपटून पुन्हा लोला पळतेय, शेजारचा कुत्रा तिच्यावर हल्ला करतो, लंगड़ात बापाच्या ऑफिस मधे पहिल्या भागापेक्षा उशिराने पोचते, ज्या बाईसाठी लोलाचा बाप सोडून जाणार होता ती बाई लोलाच्या बापाला फसवते, लोला चौकीदाराच्या कमरेचं पिस्तूल वापरून जबरदस्तीनं पैसे घेते; बैंक लुटते, पैसे पिशवीत भरते, बाहेर येते. तोपर्यंत पोलिसांनी ऑफिसला वेढा घातलाय. दारावर बंदुका रोखल्याहेत. लोला घाबरते, पण तेवढ्यात एक ऑफिसर तिला बाजूला करतो आणि सगळे पुन्हा दारावर बंदुका रोखून उभे राहतात! दरोडेखोर म्हणून लोलाची शक्यता कुणीच विचारात घेत नाही! लोला पळते, मनीपाशी पोचते; पण रस्ता क्रॉस करणाऱ्या मनीला एक ऍम्ब्युलन्स धडक मारते. लोलाच्या हातून पैशाची पिशवी खाली पडते. आता मनीला लोलाबरोबरचा संवाद आठवतो. नव्या शक्यतांचं काहूर माजतं- हेही त्याला नकोय. तो "नाही' म्हणून ओरडतो - पुन्हा खाली पडणारी पैशाची पिशवी- खाली पडणारा टेलिफोन रिसिव्हर - दुसरी शक्यता संपते. फोन क्रेडलवर आपटतो आणि लोला धावू लागते!
शक्यता ३:
रस्त्यावर धावणाऱ्या लोलाकडे बघणाऱ्या आणि यापूर्वीच्या दोन्ही शक्यतांमध्ये अपघात झालेल्या माणसाशी या वेळी लोला बोलते, त्यामुळे अपघात होत नाही. परिणामी तो गाडी घेऊन निघून जातो. लोलाच्या वडिलांचा तो मित्र आहे. लोला त्याच्या ऑफिसमध्ये पोचायच्या आत तो पोचतो आणि त्यांना घेऊन बाहेर पडतो. त्यांची लोलाशी भेट होत नाही. लोला आता कॅसिनोत जाते. मनीचा जीव वाचवायला वीस मिनिटं तिच्याकडे असतात. ती आपल्याजवळचे २० मार्क्स आणि काही चिल्लर जुगारत लावते, २० या आकाड्यावर दोनदा जुगार लावून तिच्याकडे आता १ लाख मार्क्स पेक्षा जास्त पैसे जमा होतात, इकडे मनी ला तोच भिकारी आणि त्याची १ लाख मार्क्स असलेली पिशवी दिसते, मनी त्या भिकार्याकडून पिस्तूल च्या बदल्यात पैसे परत घेतो, लोला पैसे घेउन धावते, मनीपाशी पोचते, पण मनी कुठेच दिसत नाही, मनी एका कार मधून उतरताना दिसतो, त्याने पैसे बॉसला परत केलेले असतात. मनी आणि लोला चालू लागतात, मनी लोला ला विचारतो 'बैग मधे काय आहे?', लोला कैमरामधे बघून सूचक हसते आणि तिसरी शक्यता संपते!
वीस-वीस मिनिटांच्या या तीन शक्यता दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्टीविषयी लिहायचं तर कदाचित वीसपेक्षा जास्त पानं लागतील! लोला धावतांना ज्यांना धडकते त्यांच्याही भविष्यातल्या शक्यता दिग्दर्शक स्नॅपशॉट्सच्या माध्यमातून दाखवतो. तिन्ही वेळा लोला त्यांनाच धडकते आणि प्रत्येकदा वेगवेगळ्या शक्यता दिसतात. त्या एकमेकांपेक्षा अगदी टोकाच्या वेगळ्याही असू शकतात. पहिल्या शक्यतेत डिपार्टमेंटल स्टोअर्स लुटणाऱ्या लोलाला पिस्तुलाच्या सेफ्टी लॉकबद्दल मनी सांगतो; मात्र दुसऱ्या शक्यतेत बापाला लुटणाऱ्या लोलाला त्याची माहिती असते! वडिलांचं सेक्रेटरीशी असलेलं अफेअरही तीन वेगवेगळ्या शक्यतांवर संपतं!
या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे लोलाचं पळणं. प्रत्येक शक्यतेसाठी जीवाच्या आकांतानं पळणारी लोला एवढंच काय ते सत्य. उरलेल्या सर्व शक्यता बदलत्या, चांगल्या, वाईट. पुन्हापुन्हा दिसणारी तीच ती माणसं. पण दर वेळी त्यांचा बदललेला ऍटिट्यूड. हे की ते, चांगलं की वाईट, खरं की खोटं या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या शक्यता तेवढ्या बदलतात आणि त्यांच्यामागे आपण त्या लोलासारखे फक्त पळत असतो.एकाच प्रश्नाच्या हजारो शक्य उत्तरामागे .
प्रत्येकाने एकदातरी बघावाच असा हा चित्रपट. :)
निखिल. :)
No comments:
Post a Comment