आज मी सकाळ पासून काय काय दिवे लावलेत, त्याची ही यादी............
उठलो १० वाजता,
ब्रश आणि नाश्ता १०:३० पर्यन्त 'उरकला'....
मेरी रामप्यारी वर टांग मारली आणि व्यायाम शालेत गेलो, कार्डियो आणि स्त्रेचेस केले, ट्रेनर नावाचा राक्षस माझ्या व्यायामाची यादी घेउन पुढे पुढे नाचत होता...
एब्स केले आणि थोड़ा आराम केला, आज दिवस खुपच चांगला होता त्यामुलेच जिम मस्त जाली आज....
घरी आलो तेव्हा पाहुणे आले होते लग्न पत्रिका घेउन...त्यांच्या समोर ओळख परेड जाली आमची....( जमतय बहुदा ह्या वसंता मधे :-) )
स्नानादि नित्य तुच्छ कर्मे मातोश्रींच्या दबावाखाली करावीच लागली...
आमच्या माते कडून असे समजले की काल रात्रि बिल्डिंग मधे जबरी चोरी झाली, त्यात माजे परम-प्रिय हंटर शुज गेले. (२ मिनिट शांतता)
छानपैकी जेवणावर आडवा उभा सगळे हात मारले आणि comp चालू केला...पण तो लगेच बंद केला कारण माझी सात जन्माची बायको माझ्या डोळ्यात अवतरली होती...तिचे ऐकले आणि गादीला माझी पाठ टेकली...डोक्यात विचार चक्र चालूच होते...तेवढ्यात पोटाने आवाज दिल्याने धावपळ झाली जरा...कालच आमच्या घरी पाव-भाजी चा बेत होता, बेकरी वाल्याने काल पावाची भट्टी १ तास जास्त चालू ठेवली होती, २५ जोड्या पाव संपल्यावरच माझी भूक शांत झाली होती ..( जिम ट्रेनर चा आत्मा रागाने पाव-भाजी मधे भरकटला असावा बहुदा ) असो...
कार्यालयीन कामकाजाची वेळ जवळ यायला लागली होती, ३ वाजता कार्यालयात पोहचलो...कामकाज संपवले आणि ब्लॉग लिहावयास घेतला...अजुनही बरेच काही घडायचे दिवसात, पण काही विशेष असेल असे वाटत नाही...
त्यामुलेच आजच्या दिवसाची रजा घेतो आणि माझे हे अत्यंत बोर करणारे भाषण संपवतो....
ब्लॉग लिहत होतो तेव्हा पासूनच माझ्या मागे पुणेरी बघ्यांची गर्दी जमा झाली आहे...
खुर्ची फिरवतो आणि त्यांचा समाचार घेतो...:-)
तो पर्यंत, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र...:-)